ससून सर्वोपचार रुग्णालयातील कैदी पलायन प्रकरणात अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर आणि अस्थिव्यंगोपचार विभागातील पथकप्रमुख डॉ.प्रवीण देवकाते यांच्यासह इतर अधिकारी दोषी आढळले आहेत. या प्रकरणी राज्य सरकारने डॉ.ठाकूर यांना पदमुक्त केले असून, डॉ.देवकाते यांना निलंबित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याप्रकरणी राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती ११ ऑक्टोबरला नियुक्त केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर होते. ही समिती १५ दिवसांत चौकशी करून सरकारला अहवाल सादर करणार होती. समितीचे अध्यक्ष डॉ. म्हैसेकर यांनी १५ दिवस संपताच तातडीने २७ ऑक्टोबरला चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांना सादर केला होता.

हेही वाचा >>> ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; मध्यवर्ती भागासह उपनगरात ऐन दिवाळीत तारांबळ

हा अहवाल निवतकर यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडे पाठवला जाणार होता. वाघमारे हे परदेश दौऱ्यावर होते. ते परतल्यानंतर ३ नोव्हेंबरला हा अहवाल त्यांच्यासमोर सादर करण्यात आला. नंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे दौऱ्यावर होते. ते दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांच्याकडे अखेर ८ नोव्हेंबरला अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी राज्य सरकारने ससूनचे अधिष्ठाता डॉ.ठाकूर यांना पदमुक्त केले तर डॉ.देवकाते यांचे निलंबन केले

उच्च न्यायालयाचाही डॉ.ठाकूर यांना दणका

दरम्यान, ससूनचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केली. याप्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिलेल्या आदेशाला डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ठाकूर यांच्या विरोधात निकाल दिल्याने तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग खुला झाला आहे.

हेही वाचा >>> पुणे : बालाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीमाभिंत कोसळली, मोटारीचे नुकसान; सुदैवाने जखमी नाही

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय चौकशी समितीचा अहवाल शासनास सादर झाला. त्यामध्ये अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. प्रवीण देवकाते व इतर अधिकारी दोषी आढळले आहेत. त्यामुळे डॉ.ठाकूर यांना पदमुक्त तर डॉ.देवकाते यांचे निलंबन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. –दिनेश वाघमारे, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग