पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील बोगद्याजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळविण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. संध्याकाळपर्यंत द्रुतगती मार्गावरील वाहतूक बंदच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
गेल्या दोन दिवसांपासून लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यातच सोमवारी सकाळी खंडाळा घाटातील बोगद्याजवळ दरड कोसळली. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. ही वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळविण्यात आली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक द्रुतगती मार्गावरून धीम्या गतीने सुरू आहे. दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी ही घटना घडल्याने महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र सकाळी पाहायला मिळत होते.
(संग्रहित छायाचित्र)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा