लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: वेल्हे तालुक्यातील दापसरे आणि घोळ गावादरम्यान असलेल्या रस्त्यावर बुधवारी रात्री दरड कोसळली. दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

वेल्हे तालुक्यातील घोळ-दापसरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी रात्री दरड कोसळली. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बसमधील वाहक, चालक, प्रवाशांना राहण्यासाठी दापसरे जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दापसरे-घोळ रस्त्यावर पडलेली दरड जेसीबी यंत्राच्या सहायाने काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरडीचा काही भाग हटविल्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला करुन देण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.

आणखी वाचा-लोणावळाकरांना पावसाने झोडपले, सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पावसाची नोंद; २४ तासांत २७३ मिलीमीटर पाऊस

वेल्हे तालुका दुर्गम आहे. या भागातील अनेक गावे डोंगररांगात वसली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. या भागातील ग्रामस्थांना प्रशासन आणि पोलिसांनी सूचना दिल्या आहेत.