निजामुद्दीन-पुणे दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनावर शुक्रवारी सकाळी दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास खंडाळा घाटातील मंकी हिलजवळ ही घटना घडली. या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही.
मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक वेगळ्या ट्रॅकवरून वळविण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. रेल्वेमार्गावरील दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, ते पूर्ण होण्यास सुमारे पाच तास लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुण्याहून शुक्रवारी सुटणाऱया पुणे-निजामुद्दीन रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
दुरांतो एक्स्प्रेसवर दरड कोसळली; मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत
निजामुद्दीन-पुणे दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनावर शुक्रवारी सकाळी दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
First published on: 28-06-2013 at 10:49 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Landslide on duranto express near monkey hill