निजामुद्दीन-पुणे दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनावर शुक्रवारी सकाळी दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास खंडाळा घाटातील मंकी हिलजवळ ही घटना घडली. या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. 
मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक वेगळ्या ट्रॅकवरून वळविण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. रेल्वेमार्गावरील दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, ते पूर्ण होण्यास सुमारे पाच तास लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुण्याहून शुक्रवारी सुटणाऱया पुणे-निजामुद्दीन रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा