पुणे : राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुहास पळशीकर यांनी भाषा सल्लागार समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा… पुणे: डेटिंग ॲपवर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार; आरोपीकडून तरुणीची आर्थिक फसवणूक
हेही वाचा… पुणे: नियमित तिकीट दरात आता ‘अभि’ विमानतळ बससेवा
राज्य शासन जे साहित्यविषयक पुरस्कार देते त्यापैकी एका जाहीर झालेल्या पुरस्काराचा निर्णय अलीकडेच शासनाने रद्द केला आहे. ही बाब मला अनुचित वाटते. शासनाच्या तज्ज्ञ समित्या आणि अभ्यास गट यांना स्वायत्तता नसेल तर अशा यंत्रणांच्या मार्फत चांगले काम होणे अवघड आहे असे मला वाटते. अनुवादासाठी पुरस्कार मिळालेल्या पुस्तकाचा पुरस्कार केवळ ऐकीव माहिती आणि पूर्वग्रह यांच्या आधारे शासनाने रद्द करणे ही घटना म्हणजे शासन वैचारिक स्वातंत्र्य आणि मतभिन्नता यांचा आदर करीत नाही याचा संकेत आहे, अशी भूमिका स्पष्ट करून पळशीकर यांनी भाषा सल्लागार समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.