लोणावळा : आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी पर्यटकांनी लोणावळा, खंडाळा परिसरात गर्दी केली होती. शहरातील सर्व रस्त्यांवर कोंडी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वेहरेगाव ते कार्ला फाटा, खंडाळ्यातील राजमाची गार्डन परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होता. आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने मुंबई- पुण्यासह वेगवेगळ्या भागातील पर्यटकांनी वर्षाविहारासाठी गर्दी केली होती. पर्यटक शनिवारी (२३ जुलै) सहकुटुंब मोटारीतून लोणावळा, खंडाळा परिसरात आले होते. अनेकांनी हाॅटेलमधील खोल्यांचे आगाऊ आरक्षण केले होते.
लोणावळा, खंडाळा परिसरातील सर्व ठिकणी पर्यटकांची गर्दी झाली होती. श्री एकवीरा देवीच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वेहेरेगाव ते कार्ला फाटा परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोणावळा शहरात पुणे-मुंबईतून मोठ्या संख्येने मोटारीतून पर्यटक आले होते. खंडाळ्यात मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती. खंडाळ्यातील शासकीय रुग्णालय परिसरात वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले. लोणावळ्यातील रायवुड पार्क, सहारा पूल ते मावळ चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.