पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे मंगळवार पेठ, जुना बाजार परिसर, तसेच पुणे स्टेशन, बंडगार्डन रस्ता परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा >>> भारतात दुचाकी एवढ्या महाग का? राजीव बजाज यांनी दिलं उत्तर…
एसएसपीएमएस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. पदाधिकाऱ्यांकडे खासगी बसमधून कार्यकर्त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था सोपविण्यात आली होती. मोटारीतून अनेक कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. सभेसाठी झालेल्या मोठ्या गर्दीमुळे मंगळवार पेठ, सोमवार पेठ, बंडगार्डन रस्ता, जुना बाजार, पुणे स्टेशन परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सभेच्या ठिकाणी, तसेच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.