लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: केंद्रीय निबंधकांकडे नोंदणी असलेल्या राष्ट्रीय किंवा बहुराज्यीय संस्थांची देशातील एकूण संख्या ८ लाख ५४ हजार ३५५ इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आली. राज्यात अशा सर्वाधिक २ लाख ५ हजार ८८६ संस्थांचे जाळे असल्याची माहितीही समोर आली आहे.

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या वतीने देशभरातील सहकारी संस्थांच्या माहितीचे संकलन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात ग्राम विकास सोसायट्या, दुग्ध संस्था आणि मत्स्य व्यवसाय संस्थांची मोजणी करण्यात आली होती, त्यांची संख्या २.६४ लाख इतकी आहे. पहिल्या टप्प्यातील नोंदी फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा… लाखोंची हौस! मोटारींच्या आकर्षक क्रमांकासाठी होऊ दे खर्च!

आता दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय निबंधकांकडे नोंदणीकृत असलेल्या सहकारी संस्था किंवा फेडरेशनच्या माहितीचे संकलन पूर्ण झाले आहे. त्यानुसार राज्यात सर्वाधिक २ लाख ५ हजार ८८६ संस्था आहेत. महाराष्ट्राच्या खालोखाल गुजरातमध्ये ७७,५५०, आंध्र प्रदेशात ७३,२१८, तेलंगाणात ६५,१५६ आणि उत्तर प्रदेशात ४८,१८८ संस्था आहेत. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या वतीने तीन टप्प्यांत देशातील सर्व सहकारी संस्थांच्या माहितीचे संकलन केले जात आहे. तिसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व सहकारी संस्थांची माहिती संकलित केली जाणार आहे.

योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोग

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या माहितीचे संकलन केले जात आहे. सहकार किंवा सहकार खात्याशी संबंधित कोणतीही योजना राबविण्यासाठी या माहितीचा उपयोग होईल. केंद्र सरकारला थेट खेडे गावातील सहकाराशी संबंधित असलेल्या शेतकऱ्याशी थेट संबंध साधता येईल, असे मत सहकार क्षेत्राचे अभ्यासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Largest network of cooperative societies in maharashtra pune print news dbj 20 dvr