देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजनिमित्त पाच फूट उंच आणि ३० फुटांचा घेर असलेली पगडी तुकोबाचरणी अर्पण करण्यात आली. ही जगातील सर्वांत मोठी पगडी असल्याचा दावा केला जात आहे. याची दखल वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया आणि जीनियस बुकने घेतली आहे. तुकोबाचरणी ही पगडी अर्पण करण्यात आली असून, देहू देवस्थानाकडूनही या भल्यामोठ्या पगडीचे कौतुक करण्यात आले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बीजनिमित्त व्यावसायिकाने तुकोबांच्या मंदिरात भलीमोठी पगडी भेट दिली आहे. ही पगडी पाहण्यासाठी तुकोबांच्या मुख्य मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. या पगडीचे आज अनावरण करण्यात आले. दिलीप सोनिगराकडून ही पगडी भेट देण्यात आली आहे. सुती कपड्यांपासून बनविण्यात आलेल्या तुकोबांच्या पगडीचा घेर हा तब्बल ३० फुटांचा असून, उंची पाच फुटांपर्यंत आहे. देहू संस्थानाकडून पगडीचे कौतुक करण्यात आले. संस्थानाच्या अध्यक्षांसह विश्वस्तदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. भाविकांच्या उपस्थितीत या पगडीच अनावरण झाले. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जयघोष करण्यात आला.