मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी केवळ पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. २६ डिसेंबरनंतर मतदार नोंदणीचे अर्ज आल्यास संबंधित मतदारांची नावे अंतिम मतदारयादीत येणार नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे नव्या वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यास २६ डिसेंबरपर्यंत अर्ज करणाऱ्या नागरिकांनाच मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>>पुणे: राज्यात थंडीचे पुनरागमन

Congress Complete Candidate List in Marathi
Congress Candidate List: राष्ट्रीय पक्षांचा राज्यात तंटा, महाराष्ट्रात ‘इतक्या’ ठिकाणी काँग्रेस भाजपाला थेट भिडणार; वाचा पक्षाच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Collective transportation of voters to voting center in vehicles will be crime
सावधान! केंद्रावर मतदारांची ने-आण करणे गुन्हा, शेवटच्या ४८ तासांतही प्रचार, पण…
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
Chandrapur marathi news
एकदाच मतदान करण्याचा अधिकार…पण, या गावात मात्र दोन वर्षांत चौथ्यांदा…
uttar pradesh leaders in pune for candidates campaigning maharashtra assembly election 2024
विधानसभेसाठी उत्तरप्रदेश मधील नेतेही मैदानात ! पुण्यातील येरवडा भागात १७ नोव्हेंबरला होणार सभा

जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारयादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर प्राप्त हरकती व सूचना २६ डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यापासून २६ डिसेंबरपर्यंत मतदार म्हणून नावनोंदणी केलेल्या नागरिकांचे अर्ज मतदार म्हणून स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच या मतदारांची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट केली जाणार आहेत. २६ डिसेंबरनंतर मतदार नोंदणी अर्ज केलेल्यांची नावे ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या अंतिम मतदारयादीत समाविष्ट केली जाणार नसल्याची स्पष्टोक्ती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.

हेही वाचा >>>उच्च शिक्षणाच्या आठ सीईटींचा अभ्यासक्रम जाहीर

दरम्यान, महापालिकांच्या निवडणुका नव्या वर्षात मार्च महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणारी अंतिम मतदारयादीच महापालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी मतदारयादीत आपले नाव आहे किंवा कसे, हे तपासावे. मतदारयादी नाव नसल्यास जास्तीत जास्त मतदारांनी मतदारयादीत नाव नोंदवावे, असे आवाहनही भोसले यांनी केले आहे.

मतदार यादीत नाव कसे तपासाल?
मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर समजेल. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरावा, पत्ता बदलण्यासाठी आठ-अ, तर नाव वगळणीसाठी सात क्रमांकाचा अर्ज भरावा, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>‘जेईई मुख्य’साठी ७५ टक्क्यांची अट; राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाचा निर्णय; विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील मतदार
मतदारसंघ मतदार
वडगाव शेरी ४,२६,७९७
शिवाजीनगर २,७३,९३४
कोथरुड ३,८५,०७७
खडकवासला ५,०६,५२१
पर्वती ३,२७,९२६
हडपसर ५,२५,१७४
पुणे कँटोन्मेंट २,६५,०९५
कसबा पेठ २,७४,३७७

पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील मतदार पुढीलप्रमाणे
प्रारुप यादीनुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाच लाख ६१ हजार ९८८, पिंपरीत तीन लाख ५५ हजार ७५८, भोसरीत पाच लाख पाच हजार ८८५, तर ग्रामीण भागात जुन्नरमध्ये तीन लाख सहा हजार २५७, आंबेगावात दोन लाख ९५ हजार ५९६, खेडमध्ये तीन लाख २९ हजार ६४४, शिरूरमध्ये चार लाख नऊ हजार ३२२, दौंडमध्ये तीन लाख चार हजार ४७२, इंदापुरात तीन लाख १३ हजार १८४, बारामतीमध्ये तीन लाख ५५ हजार १४७, पुरंदरमध्ये चार लाख सात हजार ८५७, भोरमध्ये तीन लाख ८९ हजार ६४१ आणि मावळ मतदारसंघात तीन लाख ५७ हजार २९८ मतदार आहेत.