लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल ४७७७ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. मात्र, नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याला ३० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटचे नऊ दिवस शिल्लक राहीले आहेत.
मार्च महिन्यात म्हाडा पुणे मंडळाने सोडत जाहीर केली. ८ मार्चपासून या सोडतीमधील घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. मात्र, या कालावधीत केवळ १६ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे अर्ज करण्यासाठी ३० मे रोजी रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा