पुण्यात शुक्रवारी दीनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा लता मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि अन्य मंगेशकर कुटुंबीय यावेळी हजर होते. मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटले. तत्पुर्वी पुण्यात झालेल्या जाहीर सभेत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसशासित राज्यांमध्ये गरिबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यामुळे कुणी कीती विकास केला याची खुली चर्चा करा असे आव्हान मोदींनी काँग्रेसला दिले आहे. मोदींवर आरोप करण्याची फॅशनच झाली असल्याचा टोला त्यांनी काँग्रस नेत्यांना लगावला होता.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारतीच्या उद्‍घाटन समारंभात लता मंगेशकरांनी मोदी यांच्या नम्रपणाचे आणि मितभाषी स्वभावाची जाहीर प्रशंसा केली. भविष्यात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो, अशा सूचक शुभेच्छाही दीदींनी मोदींना दिल्या.

Story img Loader