पुणे : अल्पावधीत तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेली लावणी नृत्य कलाकार गौतमी पाटील हिच्या एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 शिवणेतील देशमुखवाडी भागात एका राजकीय पक्षााच्या कार्यकर्त्याने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम शुक्रवारी (१० फेब्रुवारी) आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता होती तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी तिच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली. गौतमीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने कार्यक्रमासाठी बोलावले होते. या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lavani dancer gautami patil show in pune denied permission pune print news rbk 25 ysh