पुणे : लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाटील एका कार्यक्रमात वस्त्रे बदलत असताना तिची चोरून ध्वनीचित्रफीत तयार करण्यात आली. त्यानंतर समाजमाध्यमावर संबंधित ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नव्या पुण्यासाठी द्रष्टे सुनियोजन व अंमलबजावणीची गरज…
हेही वाचा – पुणे : पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा गळा दाबून खून; कोंढव्यातील घटना
याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कलाकार गौतमी पाटील एका कार्यक्रमात वस्त्रे बदलत असताना मोबाइल कॅमेऱ्यावरून ध्वनिचित्रफीत काढण्यात आली. आरोपीने समाजमाध्यमावरील दोन खात्यातून ध्वनिचित्रफीत प्रसारित केली. तक्रारदार महिला आणि सहकाऱ्यांची ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी समाजमाध्यमातून देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करत आहेत.