उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात तरुणीला कोयत्याने झालेल्या हल्ल्यातून वाचवणाऱ्या तरुणांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचंही व्यक्तिगतरित्या कौतुक केलं. भाजपाचे माजी आमदार व पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या फोनवरून हा संवाद झाला. यावेळी फडणवीसांशी बोलताना लेशपाल जवळगेनेही आपली भावना व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात तरुणीला कोयत्याने झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचवण्याबद्दल लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचं कौतुक केलं. फडणवीस आधी हर्षद पाटीलशी बोलले आणि कौतुक केलं. त्यावर हर्षदने धन्यवाद मानले. तसेच फोन लेशपाल जवळगेकडे दिला. त्यानंतर फडणवीस लेशपाल जवळगेशी बोलले. यावेळी देवेंद्र फडणवीसांशी फोनवर बोलताना लेशपालने फडणवीसांचा फोन आल्याने फार छान वाटत असल्याची भावना व्यक्त केली.

व्हिडीओ पाहा :

फडणवीसांनी तरुणीला वाचवल्याबद्दल कौतुक केल्यावर लेशपाल जवळगे म्हणाला, “धन्यवाद. तुमचा फोन आला आणि तुम्ही आमच्याशी बोलत आहात हे फारच छान वाटत आहे.”

हेही वाचा : “त्या मुलीची जात कुठली?…”, पुण्यातील कोयता हल्ल्याप्रकरणी लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत

नेमकं काय घडलं होतं?

मंगळवारी एका तरुणाने त्याच्या मैत्रिणीवर कोयत्याने हल्ला केला. दिवसाढवळ्या भररस्त्यात हा तरुण हातात कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावला, परंतु, तरीही अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. यावेळी लेशपाल जवळगे या एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने जीवाची बाजी लावत त्या तरुणीला माथेफिरूच्या तावडीतून सोडवलं.

वीस वर्षीय तरुणी कोथरूड येथील सुतरदारा भागात राहायला आहे. आरोपी शंतनु जाधव तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्याने सदाशिव पेठेत पावन मारुती मंदिराजवळ सकाळी तरुणीला गाठले. तरुणीला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला झिडकारले. तेव्हा त्याने तिच्यावर कोयत्याने वार केले. 

हेही वाचा : महाविद्यालयीन तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीने कोयता कोठून आणला ?… पोलिसांकडून शोध सुरू

भररस्त्यात हा थरार सुरू असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, मुलीच्या ओरडण्याचा आवाज येताच लेशपाल जवळगे याने पीडितेच्या दिशेने धाव घेत तिला कोयत्याच्या हल्ल्यातून वाचवलं. पीडिता मदतीसाठी हाका मारत होती, तरीही तिच्या मदतीला कोणी आलं नाही. तेव्हा लेशपाल याने आपल्या जीवाची पर्वा न करता कोयता हातात घेऊन पीडितेच्या दिशेने धावणाऱ्या तरुणाला मागून दोन्ही हातांनी पकडलं. तिच्यावर वार होण्याआधीच लेशपालने तो वार उलटवला, त्यामुळे या पीडितेचा जीव वाचला.