लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी हत्ये प्रकरणात पुण्यातून लॉरेन्स बिष्णोई टोळीतील सराइत शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीणला रविवारी अटक करण्यात आली. पुण्यात लॉरेन्स बिष्णोई टोळी सक्रीय असून, टोळीतील सराइतांची यादी तयार करण्याचे काम गुन्हे शाखेकडून हाती घेण्यात आले आहे.

baba siddiqui murder case
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, चौथ्या आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश!
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
traffic police get abuse and threat in hiranandani meadows area in thane
पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धमकी
beggar woman arrested for stealing gold worth rs 35 lakh and cash from house
पुणे : भीक मागण्याचा बहाण्याने चोरी करणारी तरुणी गजाआड, ३५ लाखांचे दागिने जप्त; चंदननगर पोलिसांची कारवाई
Delivery boy killed
दीड लाखांचा iPhone ऑनलाईन मागवला, डिलिव्हरी मॅन येताच पैसे देण्याऐवजी त्याचाच जीव घेतला
three suspects in police custody for attempt to killing three students by throwing them in a well
नाशिक : विहिरीत तीन विद्यार्थ्यांना फेकून मारण्याचा प्रयत्न – संशयित ताब्यात
Munawar Faruqui Death Threat
Munawar Faruqui : बिग बॉस विजेत्या मुनव्वर फारुकीला ठार मारण्याची धमकी, तडकाफडकी ‘या’ ठिकाणी रवाना
Ganesh immersion processions without band in Thane
यावर्षीही ठाण्यात ढोलाताशांविना विसर्जन मिरवणुकांचा थाट

सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी शुभम लोणकरने समाज माध्यमात धमकी देणारा संदेश प्रसारित केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने लोणकरचा शोध सुरू केला. वारजे भागातून गुन्हे शाखेच्या पथकाने लोणकरचा भाऊ प्रवीणला अटक केली. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. सिद्दीकी हत्या प्रकरणात प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम सामील असल्याचे तपासात उघडकीस आले. लोणकर मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट गावचा रहिवासी आहे. पुण्यात बिष्णोई टोळी सक्रीय असल्याचा संशय असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने टोळीतील सराइतांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा-राज्यात यंदा ‘आरटीई’च्या २६ हजारांहून अधिक जागा रिक्त… नेमके काय झाले?

शुभम जुलै महिन्यात बेपत्ता

शुभम आणि त्याचे कुटुंबीय २०११ मध्ये पुण्यात आले होते. विद्यार्थी दशेत तो राष्ट्रीय छात्र सेनेत (एनसीसी) होता. सुरुवातीला त्याने पुण्यात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला. बिष्णोई टोळीच्या समाज माध्यमातील चित्रफिती पाहून तो आकर्षित झाला. त्याचे कुटुंबीयांना त्याला मोबाइल वापरास बंदी केली होती. जुलै महिन्यात तो घरातून बेपत्ता झाला. माझी काळजी करु नका, असे त्याने आई-वडिलांना सांगितले होते. त्यानंतर तो राजस्थानात गेला होता. राजस्थानात तो बिष्णोई टोळीतील सराइतांच्या संपर्कात आला. २०२२ मध्ये शुभम आणि त्याचा भाऊ अकोला पोलिसांनी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गु्न्हा दाखल केला होता. त्यांच्याकडून पाच पिस्तूल जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर शुभमचा भाऊ प्रवीणने वारजे भागात लोणकर डेअरी सुरू केली होती. शुभमचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.