कनिष्ठ महिला वकिलाचा विनयभंग केल्या प्रकरणी एका वकिलाच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.ॲड. धर्मराज विनायक जाधव (वय ४०, रा. वाघोली) असे गुन्हा दाखल केलेल्या वकिलाचे नाव आहे. याबाबत एका महिला वकिलाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वकील महिला ॲड. जाधव यांच्याकडे कनिष्ठ वकील म्हणून काम करत आहे. तक्रारदार वकील महिला आणि ॲड. जाधव काही दिवसांपूर्वी नगर रस्त्यावरुन मोटारीतून येत होते. त्या वेळी ॲड. जाधव यांनी जाणीवपूर्वक गाणे म्हणून लज्जास्पद वर्तन केले. त्यानंतर महिला वकिलाचा शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात ॲड. जाधव यांनी विनयभंग केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला वकिलाने या प्रकाराची माहिती पतीला दिली. तेव्हा ॲड. जाधव यांनी दोघांना धमकावले तसेच त्यांना धक्काबुक्की केली. घाबरलेल्या महिला वकिलाने ॲड. जाधव यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawyer molested junior female lawyer pune print news amy