पुणे: राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणखी तिसऱ्या सदस्याने राजीनामा दिला आहे. आयोगाचे योगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यामुळे महिनाभरात आयोगातील तीनजणांनी राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आरक्षणावरून राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाला पत्र पाठवून मराठा समाजाचे सामाजिक मागसलेपण सिद्ध करण्याबाबत अभ्यास सुरू करण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यानुसार आयोगाने काम सुरू केले आहे. आयोगाचे पुण्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. कामाचा व्याप लक्षात घेता आयोगात काम करणे शक्य नसल्याचे सांगत प्रा. डॉ. संजीव सोनावणे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सर्व समाजांचे सर्वेक्षण करण्याच्या मागणीवरून मतभेद झाल्याने ॲड. बालाजी किल्लारीकर यांनी राजीनामा दिला होता.

हेही वाचा… मेट्रोचे काम करताना बाणेर परिसरात हातबॉम्ब सापडले

आता लक्ष्मण हाके यांनी राजीनामा सादर केला आहे. हाके हे जून २०२१ पासून आयोगाचे सदस्य होते. आयोगाच्या बैठकीत वैचारिक मतभेदांमुळे व्यथित होवून आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे हाके यांनी पत्रात म्हटले आहे. आयोगाच्या अध्यक्षांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हाके यांनी राजीनामाची प्रत पाठवली आहे.

मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे निकष अंतिम झाले असून राज्य सरकारच्या परवानगीनंतर सर्वेक्षणाला सुरूवात होणार आहे. आता राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य एकापाठोपाठ राजीनामे देत असल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रक्रियेचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman hake a member of the state backward classes commission has suddenly resigned pune print news psg 17 dvr