चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील बहुचर्चित लढतीत निवडून आलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी आपल्या विजयामागे ‘सोशल मीडिया’चे महत्त्वपूर्ण योगदान असल्याची कबुली दिली आहे.
पिंपरीतील ‘पीसीबी’ वेबपोर्टलच्या वर्धापनदिनानिमित्त आमदार महेश लांडगे, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. आमदार शरद सोनवणे, महापौर शकुंतला धराडे, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेविका सीमा सावळे, शारदा बाबर, आशा शेंडगे, संयोजक सारंग कामतेकर आदी उपस्थित होते. या वेळी ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांचे ‘ई माध्यमांचे भवितव्य व आव्हाने’ या विषयावर व्याख्यान झाले.
जगताप म्हणाले,‘लोकसभेच्या पराभवानंतर आपण निराश होतो, विधानसभा लढवण्याचे नक्की नव्हते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत आपल्याविषयी मतदारांचा सकारात्मक कौल असल्याचे दिसून आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे गेलो आणि विजयी झालो.’ लांडगे म्हणाले,की अपक्ष निवडणूक लढवत होतो. अतिशय कमी दिवसात नव्याने मिळालेले ‘नारळ’ चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवायचे होते. सोशल मीडियामुळे ते काम प्रभावीपणे पार पडले व घराघरात चिन्ह पोहोचले, त्याचा फायदा झाल्यामुळेच आमदार होऊ शकलो.
‘सोशल मीडिया’मुळे आमदार झालो! – लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांची कबुली
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी आपल्या विजयामागे ‘सोशल मीडिया’चे महत्त्वपूर्ण योगदान असल्याची कबुली दिली आहे.
First published on: 06-07-2015 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman jagtap and mahesh landge accepted importance of social media