मोठय़ा थकबाकीदारांकडे दुर्लक्ष करून गोरगरीब नागरिकांच्या घरासमोर बँड बाजा वाजविला जातो, हे ‘बँड बाजा’ पथक तातडीने बंद करावे, अशी मागणी माजी आमदार लक्ष्मण जगताप यांनी थेरगाव येथे बोलताना केली. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याविषयीचा निर्णय होईपर्यंत शास्तीकराची आकारणी करू नये, असेही ते म्हणाले.
शास्तीकराच्या विरोधात जगताप यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव, रहाटणी, काळेवाडीतील रहिवाशांनी मोर्चा काढला. या वेळी शास्तीकरांच्या नोटिसांची होळी करण्यात आली. रहिवाशांच्या मागण्यांचे निवेदन सहायक आयुक्त भानुदास गायकवाड यांना देण्यात आले, त्यानंतर, ते बोलत होते. नगरसेवक कैलास थोपटे, विनायक गायकवाड, कुमार जाधव, सिध्देश्वर बारणे, संतोष बारणे, संभाजी बारणे, संदीप काटे, सारंग कामतेकर, नरेश खुळे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी होते. मूळ कर भरू, मात्र शास्तीकर भरणार नाही, असा निर्धार नागरिकांनी या वेळी केला.
वेंगसरकर अकादमीत स्थानिक मुलांना प्रवेशबंदी
थेरगावातील वेंगसरकर अकादमीमध्ये स्थानिक मुलांना क्रिकेट प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जात नाही, अशी तक्रार संभाजी बारणे यांनी केली. पालिकेच्या सुविधा आपल्याच मुलांना मिळणार नसतील तर कर कशासाठी भरायचा, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा