बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलेले लेखक लक्ष्मण माने यांचा भारतीय स्त्री शक्ती जागरण, दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र, ज्ञानप्रबोधिनी संवादिनी गट, स्वरूपवर्धिनी शारदामणी महिला विभाग, राष्ट्र सेविका समिती या संघटनांनी निषेध केला आहे.
माने निर्दोष असतील, तर त्यांनी समोर येऊन बाजू मांडावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. माने यांना त्वरित अटक व्हावी, तपासात त्रुटी राहणार नाहीत व राजकीय हस्तक्षेप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पोलीस तपासाच्या बरोबरीने नि:पक्षपाती समिती स्थापन करावी, त्यात अराजकीय, सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा समावेश करावा. तपास पूर्ण होईपर्यंत पीडित महिलांना संरक्षण मिळावे, अशा मागण्या या संघटनांनी केल्या आहेत.