महापालिका हद्दीतील स्थानिक संस्था करासाठी (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) नोंदणी केलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी त्यांचे वार्षिक विवरणपत्र सोमवार (३० जून) पर्यंत भरणे आवश्यक असून व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी वार्षिक विवरणपत्र भरण्याची सुविधा रविवारी (२९ जून) देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महापालिकेचे सहआयुक्त विलास कानडे यांनी ही माहिती दिली. व्यापाऱ्यांना त्यांची विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीनेही भरता येतील, असेही कळवण्यात आले आहे. त्या शिवाय लेखी स्वरूपात छापील फॉर्ममध्येही विवरणपत्र सादर करता येणार असून त्यासाठी महापालिकेचे एलबीटी कार्यालय रविवारी देखील सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहा या वेळेत सुरू राहणार आहे. विवरणपत्र भरण्यासंबंधी काही शंका असल्यास कार्यालयीन वेळेत २५५०१४३४ किंवा २५५०१४२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. शहरातील नोंदणीधारक व्यावसायिकांची संख्या ७५ हजार १२० इतकी असून ऑनलाईन पद्धतीने विवरणपत्र दाखल केलेल्या व्यापाऱ्यांची संख्या ११,९२२ आहे. तसेच लेखी स्वरूपात ६२६ व्यापाऱ्यांनी विवरणपत्र सादर केले आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने १ एप्रिल २०१३ पासून जकात रद्द करून एलबीटी लागू केला आहे. सन २०१३-१४ हे आर्थिक वर्ष मार्चअखेर पूर्ण झाल्यामुळे पुढील तीन महिन्यात विहित नमुन्यात विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा