पुण्याच्या नामांतरावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुणे हे मिनी इंडिया आहे. नामांतरावरून मूळ पुणेकरांना काय वाटेल याचा विचार करायला हवा. उगाच बाहेरच्यांनी सल्ले दिल्याने अडचणीचं ठरते. कुणाबद्दल ही अनादर होणार नाही. सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे. सगळीच नावं चांगली आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, सध्या राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी हे प्रश्न आहेत. तो प्रश्न असताना हे नवीन नवीन प्रस्ताव पुढे येत आहेत. त्यावर बोलणे आमच्या सारख्या राजकीय नेत्याला अवघड होते. सध्या सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. या प्रश्नावर सगळे मिळून चर्चा करून, विश्वासात घेवून निर्णय अपेक्षित आहे. पुणे हे आता कुणाएकाचे राहिलेले नाही. पुणे मिनी इंडिया आहे. मग मूळ पुणेकरांना काय वाटते याचा ही विचार करावा लागेल. उगीच बाहेरच्यांनी सल्ला द्यायला सुरुवात केली तर अडचणीचं ठरते. कुणाबद्दल ही अनादर होणार नाही. सामंजस्य भूमिका घ्यावी. पिंपरी चिंचवडला ही पुण्याचाच भाग समजले जाते. माझी विनंती आहे की, महत्वाचे विषय बाजूला ठेवायचे आणि बाकी विषय भरकटवायचे याबाबत सगळ्यांनी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे. पुढे ते म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग ठरवेल. या जागांच्या बाबतीत सर्वजण चर्चा करून निर्णय घेवू. मध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. त्या-त्या वेळी चर्चा करून निर्णय घेवू. पुढे ते म्हणाले की, निवडणुका एक वर्ष पुढे गेल्या आहेत. वास्तविक आता महापालिका निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत.