पुणे: भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्याच्या दौर्यावर असून आज त्यांनी यवतमाळ येथील सभेत उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचंय, शरद पवारांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे. अशा शब्दात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अमित शाह यांनी टीका केली. त्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पुणे दौर्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना म्हणाले की, अमित शाह यांच्या मुलाने हातामध्ये कधी बॅट पकडली नसेल,पण तो क्रिकेट बोर्डवर अध्यक्ष म्हणून काम पाहत असल्याच सांगत अमित शाह यांच्या टीकेला अंबादास दानवे यांनी चोख प्रत्युत्तर दिल्याच पाहण्यास मिळाले आहे.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत महागाई कमी होणार, तरुणाच्या हाताला रोजगार देणार, काळा पैसा परत आणणार यासह अनेक आश्वासन देण्यात आली होती. त्यापैकी एक तरी नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले का ? याबद्दल त्यांनी अगोदर उत्तर द्याव, तसेच आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदीनी कोणकोणती काम केली आहेत. ही जनतेमध्ये जाऊन सांगण्याची हिम्मत करावी,अशा शब्दात भाजप नेत्यांना त्यांनी आव्हान दिले.
हेही वाचा >>>पुणे : प्राणिसंग्रहालयातून पसार झालेल्या बिबट्याचा ठावठिकाणा लागेना! अठ्ठेचाळीस तासानंतरही शोध घेण्यात अपयश
तसेच ते पुढे म्हणाले की,अमित शाह जे बोलतात. त्यावर किती विश्वास ठेवायचा,आदित्य ठाकरे हे राजकीय जीवनात १२ ते १५ वर्षापासुन सक्रिय आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे युवासेना प्रमुखपद असून राज्य सरकारमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे मंत्रीपद देखील भूषविले आहे. आदित्य ठाकरे यांच काम राज्यातील जनतेने पाहिले आहे. तर अमित शाह यांच्या मुलाने क्रिकेटची बॅट उलटी की सुलटी पकडली नसेल, पण यांचा मुलगा (जय शाह) भारतीय क्रिकेट बोर्डवर आहे. तुम्ही किती कसोटी सामने खेळले आणि किती बॉलिंग केली. त्यावर तुम्ही अगोदर बोलाव, तुम्ही काही केले नसताना देखील क्रिकेट बोर्डवर, त्यामुळे अगोदर कर्तुत्व सांगाव,त्यांनी( अमित शाह) शिवसेनेला शिकवयाची गरज नसल्याचे सांगत गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा अंबादास दानवे यांनी खरपूस समाचार घेतल्याचे पाहण्यास मिळाले.