पुणे : मेथी, कोथिंबिरीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. कोथिंबिरीच्या सव्वालाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. पालेभाज्या स्वस्त झाल्यााने गृहिणींकडून मागणी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : कोंढव्यातील महाविद्यालय परिसरात गोळीबार?

हेही वाचा – पुणे : दारू पिताना वाद झाला, मित्राचा खून केला; दोघांना पोलिसांकडून अटक

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी पालेभाज्यांची आवक वाढली. त्यामुळे घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर आता कमी झाले आहेत. त्यात कोथिंबीर ४०० ते ७०० रुपये, मेथी ८०० ते १५०० रुपये, शेपू ४०० ते ६०० रुपये, कांदापात ६०० ते १००० रुपये, चाकवत ४०० ते ७०० रुपये, करडई ३०० ते ६०० रुपये, पुदिना २०० ते ५०० रुपये, अंबाडी ३०० ते ७०० रुपये, मुळा ४०० ते ८०० रुपये, राजगिरा ३०० ते ७०० रुपये, चुका ४०० ते ८०० रुपये, चवळई ३०० ते ७०० रुपये, पालक ८०० ते १२०० रुपये असे दर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leafy vegetables are preferred by housewives due to reduced prices pune print news rbk 25 ssb
Show comments