पुणे : मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, पालक, पुदिन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींच्या बजेटवर काही प्रमाणात ताण येणार असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : चारित्र्याच्या संशयामुळे छळाला कंटाळलेल्या पत्नीची आत्महत्या; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

घाऊक बाजारात मेथीच्या शेकडा जुडीमागे २०० रुपये, कांदापातीच्या शेकडा जुडीमागे २०० रुपये, चाकवत, पुदिन्याच्या शेकडा जुडीमागे १०० रुपये, पालकाच्या शेकडा जुडीमागे ३०० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती मार्केट यार्डातील तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी तरकारी विभागात कोथिंबिरेच्या सव्वालाख जुडी आणि मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार पालेभाज्यांचे जुडीचे दर २० ते ३० रुपयांपर्यंत आहेत. तर अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leafy vegetables became expensive in pune pune print news rbk 25 ssb
Show comments