लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. आवक वाढल्याने कोथिंबिर, करडई, राजगिरा, चवळई या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. पावसामुळे फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्यात कमी झाली होती.

Vegetables expensive pune, pitru pandharwada,
पितृपंधरवड्यात भाज्या महाग
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Lahori bar nagpur, nagpur hit and run case,
नागपूर ‘हिट अ‍ॅण्ड रन’मुळे चर्चेत आलेल्या लाहोरी बारवर वरदहस्त कुणाचा?
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
vegetable prices increased in pune marathi news
पुणे: भाज्या कडाडल्या, गौरी आगमनानिमित्त भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
Mavale statue, Shivsrushti Ratnagiri, Ratnagiri city,
रत्नागिरी शहरातील शिवसृष्टीमध्ये मावळ्यांच्या पुतळ्याची विटंबना; संशयित पोलिसांच्या ताब्यात
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

पावसाने उघडीप दिल्यानंतर हळूहळू आवक पूर्वपदावर येणार असून, मार्केट यार्डातील घाऊक बाजारात काकडी, दोडका, कारली, मटार, ढोबळी मिरची या फळभाज्यांच्या दरात घट झाली. मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, पुदिना, मुळा, पालकचे दर स्थिर होते. तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या दोन लाख जुडी, मेथीच्या एक लाख जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा-विधानसभा निवडणुकीत मतदान करायचेय? कधीपर्यंत होणार मतदार नोंदणी?

घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर कोथिंबीर ८०० ते १००० रुपये, मेथी ५०० ते ८०० रुपये, शेपू ५०० ते ८०० रुपये, कांदापात ८०० ते १००० रुपये, चाकवत ४०० ते ६०० रुपये, करडई ३०० ते ६०० रुपये, पुदिना ४०० ते १००० रुपये, अंबाडी ५०० ते ८०० रुपये, मुळे ८०० ते १५०० रुपये, राजगिरा ४०० ते ७०० रुपये, राजगिरा ५०० ते ८०० रुपये, चुका ५०० ते ८०० रुपये, चवळई ३०० ते ७०० रुपये, पालक ८०० ते १५०० रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.