पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीच्या माध्यमातून उद्योगनगरीतील रसिक प्रेक्षकांना १३ एप्रिलपासून ३१ मे पर्यंत सलग दीड महिने विविध विषयांवरील दर्जेदार व्याख्यानांची मेजवानी मिळणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज सायंकाळी सात वाजता ही व्याख्याने होणार असून ती विनामूल्य आहेत.
व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मारुती भापकर, राजेंद्र घावटे, सुहास पोफळे, नाना शिवले, राजेश फलके आदी उपस्थित होते. काळेवाडी लिंक रोड येथील कल्याण प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत सोमवारी (१३ एप्रिल) बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘अवघाची संसार’, मंगळवारी डॉ. र. ना. शुल्क यांचे ‘बोधयात्रा’, बुधवारी मंगेश तेंडुलकर यांचे ‘आर्त छंद’, गुरुवारी वसंत नूलकर यांचे ‘सोलोपॅथी जिज्ञासा’ या विषयावर व्याख्यान होईल. मोहननगरच्या लोकमान्य व्याख्यानमालेत १७ एप्रिलला अनंत दीक्षित यांचे ‘स्वामी विवेकानंद’, १८ एप्रिलला निखिल वागळे यांचे ‘भारतीय राजकारणाची दशा व दिशा’, १९ एप्रिलला विश्वंभर चौधरी यांचे ‘लोकशाहीचे मालक’, २० एप्रिलला प्रदीप साळुंके यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, २१ एप्रिलला श्रीमंत कोकाटे यांचे ‘छत्रपती शिवाजी’ या विषयावर व्याख्यान होईल. काळभोरनगरच्या सुबोध व्याख्यानमालेत २३ एप्रिलला राजेंद्र धावटे यांचे ‘छत्रपती शिवाजी’, २४ एप्रिलला जयंत करंदीकर यांचे ‘विज्ञान व अध्यात्म’, २५ एप्रिलला तेज निवळीकर यांचे ‘संत गाडगेबाबा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. चिंचवडगावातील गांधी पेठ मंडळाच्या व्याख्यानमालेत २६ एप्रिलला रवींद्र यादव यांचे ‘अपरिचित शिवचरित्र’, २७ एप्रिलला उल्का महाजन यांचे ‘भूसंपादन कायदा’, २८ एप्रिलला राज मालेगावकर यांचे ‘सरदार भगतसिंग, २९ एप्रिलला गणेश िशदे यांचे ‘जगण्यात खरी मौज आहे’, ३० एप्रिलला हिवरे बाजारच्या पोपट पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
आकुर्डीतील माउली व्याख्यानमालेत २ मे ला मारुती यादव यांचे ‘आनंदाची लयलूट’, ३ मे ला लक्ष्मण राजगुरू यांचे भारूड, ४ मे ला रूपाली अवचरे यांचे ‘थोडे आसू-थोडे हासू’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्राधिकरण संभाजी चौकातील जयहिंदू व्याख्यानमालेत ७ मे ला दत्ता सोनवणे यांचे ‘जिंकण्यासाठी दाही दिशा’, ८ मे ला अनिल गोरे यांचे ‘मराठी, शिक्षणासाठी उपयुक्त’, ९ मे ला भालचंद्र वडके यांचे ‘गडकिल्ल्यांचा राजा’, ११ मे ला नारायण देशपांडे यांचे ‘युवकांच्या हृदयाची स्फूर्ती’ या विषयावर व्याख्यान होईल. मधुश्री कलाविष्कार व साहित्य परिषदेच्या निगडीतील सेक्टर २७ येथे होणाऱ्या व्याख्यानमालेत २३ मे ला नंदकुमार मुरडे यांचे ‘समृद्ध जीवन’, २४ मे ला अश्विनी इनामदार यांचे ‘संत बहिणाबाई’, २५ मे ला राजेंद्र धावटे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर व्याख्यान होईल. पूर्णानगर येथील मातोश्री व्याख्यानमालेत २९ मे ला सिंधूताई सपकाळ यांचे ‘आईच्या काळजातून’, ३० मे ला डॉ. रामचंद्र देखणे यांचे ‘संत साहित्यातील आई’, ३१ मे ला गणेश शिंदे यांचे ‘महापुरुषांच्या माता’ या विषयावर व्याख्यान होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा