पुण्यातील वारजे भागातील अहिरे गावात आज सकाळी आढळून आलेल्या बिबट्याला तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या आढळून आला होता, याबाबतची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली. त्यानंतर वन निभागाची रेस्क्यू टीम काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी बिबट्या सुरुवातीला पत्राच्या शेड मध्ये होता. त्यानंतर तो तेथूनच दुसर्या शेडमध्ये लपून बसला. तेव्हा चारही बाजूने जाळी लावत आणि योग्य नियोजन केल्यावर तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.