लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. वाहनाच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेला बिबट्या पूर्ण वाढ झालेला आहे. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. द्रुतगती मार्गावर वडगाव मावळ परिसरात भरधाव वाहनाने बिबट्याने धडक दिली.

अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. द्रुतगती मार्गावर बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबी, तसेच वडगाव मावळ येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. वन विभागाने मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…बालाजीनगर मेट्रो स्थानकामुळे अंतरात बदल ? किती अंतरावर असणार स्थानके ?

पुणे जिल्ह्यातील मंचर, ओतूर, आळे फाटा, तसेच सोलापूर महामार्गावर दौंड परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Story img Loader