विश्रांतवाडीतील लष्कराच्या संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) आवारात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले. संस्थेच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याचे चित्रीकरणात आढळून आल्यानंतर परिसरात घबराट उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डीआरडीओ’च्या आवारात मंगळवारी पहाटे बिबट्या शिरला. संस्थेच्या आवारातील निरीक्षण मनोऱ्यावर असलेल्या जवानाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर या घटनेची माहिती त्वरित वनविभागाला कळविण्यात आली. ‘डीआरडीओ’च्या आवारात बिबट्या शिरल्याची माहिती प्रसारित झाल्यानंतर विश्रांतवाडी भागात घबराट उडाली. वनविभागाचे पथक तसेच बावधन येथील रेस्क्यु संस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले असून या भागात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संस्थेच्या आवारात दाट झाडी असून बिबट्याचा शोध घेण्यात अडचण निर्माण झाल्याचे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : पुण्यात मोबाईल दाखवत राज ठाकरेंनीच मानले मनसेचे आभार, कारण वाचून आश्चर्य वाटेल

बिबट्याला सुरक्षित वातावरणात सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. वनविभागाचे पथक ‘डीआरडीओ’च्या आवारात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरू नये. बिबट्या दिसल्यास त्वरित वनपरिक्षेत्र कार्यालय किंवा टोल फ्री क्रमांकावर (१९२६) संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा : पुणे : शहराला दहा महिने पुरणाऱ्या पाण्याचा खडकवासला धरणातून अद्यापही ८५६० क्सुसेकने विसर्ग सुरू

शहरी भागात बिबट्या, गव्याचा वावर

दाेन वर्षांपूर्वी कोथरूडमधील डहाणूकर काॅलनी तसेच पाषाण परिसरात गवा आढळून आला होता. कोथरूडमधील दाट वस्तीत गवा शिरल्यानंतर तो पळाला. त्याला पकडण्यात आले होते. मात्र, दमछाक झाल्याने गव्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मांजरीतील सीरम कंपनीजवळ असलेल्या वस्तीत बिबट्या शिरल्याची घटना घडली होती. दोन वर्षांपूर्वी मुंढव्यातील नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात बिबट्या शिरला होता. विश्रांतवाडीतील ‘डीआरडीओ’च्या आवारात दाट झाडी आहे. खेड आणि हवेली तालुक्यात बिबट्याचा वावर आहे. आळंदीपासून काही अंतरावर असलेल्या फुलगाव परिसरातून बिबट्या या परिसरात आल्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard in drdo organization in vishrantwadi pune print news tmb 01