पुणे शहरातील पूर्व भागातील मुंढवा-केशवनगर भागातील रेणुका मंदिर परिसरात एक बिबट्या अढळून आल्याने खळबळ उडाली होती. या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभाग आणि अग्निशामक दलाला यश आले आहे. या बिबट्याने ४ ते ५ लोकांवर हल्लाही होता. हा बिबट्या पळताना बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीमध्ये दडून बसला होता.
आणखी वाचा
अग्निशामकच्या माहितीनुसार, या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. दरम्यान, या बिबट्याने ७ वर्षे वयाच्या मुलावर हल्ला केला होता, या मुलाला वाचवताना इतर ३ जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमनचे बचाव पथक , वनविभाग, कात्रज येथील प्राणी संग्राहलायाची टीम यांनी संयुक्त कारवाईद्वारे जाळी टाकून बिबट्याला पकडले.
बिबट्याच्या या हल्ल्यात एक आजीबाई जखमी झाल्या आहेत. तर आदित्य भंडारी नामक तरुणही यात जखमी झाला आहे.