पुणे : लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावरील आरआयटी महाविद्यालयाच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याचे उघडकीस आले. सोमवारी सकाळी महाविद्यालयाच्या आवारात बिबट्या असल्याचे लक्षात आल्यानंतर घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग, तसेच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पुणे : लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावरील आरआयटी महाविद्यालयाच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याचे उघडकीस आले. सोमवारी सकाळी महाविद्यालयाच्या आवारात बिबट्या असल्याचे लक्षात आल्यानंतर घबराट उडाली. pic.twitter.com/5ayUUXasTu
— LoksattaLive (@LoksattaLive) August 12, 2024
महाविद्यालयाच्या परिसरात दाट झाडी आहे. वडगाव शिंदे गावाजवळ इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदीपात्रातून बिबट्या महाविद्यालयाच्या परिसरात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या आवारात बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहिमेसाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल आणि वनविभागाच्या पथकाकडून आरआयटी महाविद्यालयाच्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. बिबट्याचा शोध लागलेला नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुभाष जाधव यांनी दिली.