पुणे : हिंजवडी माहिती तंत्रज्ञान वाटिका (आयटी पार्क) परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शनिवारी शिक्कामोर्तब झाले. परिसरातील एका शेतात आढळून आलेल्या बिबिट्याच्या नवजात बछड्याला वनविभाग आणि ॲनिमल रेस्क्यू टीमने ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंजवडी परिसरात ऊसतोडणी सुरू असल्याने बिबट्या आणि त्यांचे बछडे आढळण्याचे प्रकार घडत आहेत. नेरे (ता. मुळशी) येथील ऊसाच्या फडात शनिवारी नर जातीचा एक नवजात बछडा आढळून आला. राहुल जाधव यांच्या शेतात ऊसतोड करताना एका मजुराला हा बछडा आढळला. जाधव यांनी तत्काळ वनविभाला ही माहिती दिली त्यानुसार घटनास्थळी पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल प्रज्ञा बनसोडे, आयटी पार्क हिंजवडीचे वनरक्षक पांडुरंग कोपनर, ॲनिमल रेस्क्यू टीम, वाईल्ड ॲनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन, वन्यजीव रक्षक संघटेनेचे स्वयंसेवक दाखल झाले.

हेही वाचा…अजित पवारांनी केलेल्या सर्वेक्षणात सुप्रिया सुळे आघाडीवर; रोहित पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे अडीच लाख मतांनी…”

गोंधळामुळे घाबरून बिबट मादी बछड्याला घ्यायला आली नसावी, असा अंदाज वनरक्षक कोपनर यांनी व्यक्त केला. मात्र, त्या बछड्याला मातेची गरज असल्याने बछडा ज्या ठिकाणी सापडला त्याच ठिकाणी सायंकाळी त्याला सोडण्यात आले आणि कॅमेरे लावून त्यांची निरीक्षणे नोंदविली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे आवाहन पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी केले आहे. जोपर्यंत मादी बछड्याला घेऊन जात नाही तोपर्यंत दोन-तीन दिवस ऊसतोड बंद ठेवण्याच्या सूचना वन विभागाने शेतकरी जाधव यांना दिल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard sighted in pune s hinjewadi it park area cub rescued from sugarcane field pune print news vvk 10 psg