पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून पसार झालेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी महापालिकेची धावाधाव सुरू झाली आहे. अग्निशमन दल, पोलीस, महापालिका आणि वन विभागाचे १५० कर्मचारी, हायड्राॅलिक शिड्या, ड्रोन, थर्मल कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बिबट्याचा शोध गेल्या ४८ तासांपासून सुरू आहे. दरम्यान, प्राणिसंग्रहालयातील अधिकारी वर्गाच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर पडला आहे. मात्र तो प्राणिसंग्रहालयाच्या आवारातच आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही त्याची छबी दिसून आली आहे. बिबट्या मानवी वस्तीमध्ये शिरलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. हा प्रकार पुढे आल्यानंतर बिबट्या प्राणिसंग्रहालयाच्या आवारातच आढळून आला आहे. त्यामुळे त्याला बेशुद्ध करण्यात येऊन पिंजऱ्यात ठेवण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतरही बिबट्याचा प्राणिसंग्रहालयातील ठावठिकाणा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लागलेला नाही. बिबट्याला शोधण्यासाठी प्राणिसंग्रहालय सोमवारी दुपारपासून बंद ठेवण्यात आले असून हायड्रॉलिक शिड्या, ड्रोन, थर्मल कॅमेरे या तंत्रज्ञानाद्वारेही बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
challenges in infrastructure development in india
महाशक्तीचं स्वप्न पाहणाऱ्या देशात एवढी ‘पडझड’ का होतेय?
Resolution to grant special status to Jammu and Kashmir approved
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी

हेही वाचा – पाण्याच्या थकीत देयकांवर एप्रिलपासून एक टक्का दंड आकारणी, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा निर्णय

बिबट्याला पकडण्यासाठी प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात १५ ते २० ठिकाणी सापळे (पिंजरे) लावण्यात आले आहेत. त्यात भक्ष्यही ठेवण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील अग्निशामक दलाचे पथक, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, वनविभागाने अधिकृत मान्यता दिलेले वन्यजीव संरक्षक, प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी आणि प्रशिक्षित मार्गदर्शक असे सुमारे १२० ते १५० जणांचे पथक या बिबट्याचा शोध घेत आहे. प्राणिसंग्रहालयाच्या परिसरातील अस्तित्वातील सीसीटीव्हींबरोबरच काही ठिकाणी सीसीटीव्ही तातडीने बसविण्यात आले आहेत.

बिबट्या ज्या परिसरात असण्याची शक्यता आहे, त्या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे. तिथे चार-पाच फुटांहून अधिक उंचीचे गवत, झुडपे आहेत. तिथे वन विभागाचे अधिकारी, प्रशिक्षित वन्यजीव संरक्षक, प्राणिसंग्रहालयातील तज्ज्ञांशिवाय कोणालाही प्रवेश दिलेला नाही. सोमवारी सकाळपासून सातत्याने बिबट्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

गज वाकवून बिबट्या पसार?

प्राणिसंग्रहालयातून पसार झालेल्या साडेसात वर्षांच्या बिबट्याचे नाव सचिन आहे. कर्नाटकातील हंपी येथील अटलबिहारी वाजपेयी प्राणिसंग्रहालयातून त्याला पुण्यातील प्राणिसंग्रहालयात दीड महिन्यांपूर्वी आणण्यात आले होते. पिंजऱ्याचे गज तोडून तो पसार झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, पिंजऱ्याचे गज कसे वाकले, बिबट्या ठेवण्यात आलेला पिंजरा सदोष किंवा नादुरुस्त होता का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणाही यानिमित्ताने पुढे आला आहे.

हेही वाचा – पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही! खासदार सुप्रिया सुळे यांचा दावा

बिबट्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. बिबट्या प्राणिसंग्रहालयाच्या आवारातच आहे. लवकरच त्याचा शोध घेतला जाईल. बिबट्या पिंजऱ्यातून पळून जाण्यात मानवी चुका झाल्या का, याची सविस्तर चौकशी केली जाईल. त्यात काही चुकीचे आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच प्रचलित नियमांनुसार प्राणिसंग्रहालयात आवश्यक सुधारणा केल्या जातील. – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका