पुण्यात भरदिवसा एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. यावेळी अनेकांनी बघ्याची भूमिका घेतलेली असताना लेशपाल जवळगे या तरुणाने हल्लेखोराला रोखत तरुणीचा जीव वाचवला. यानंतर त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता लेशपालची आई लक्ष्मी जवळगे यांनीही मुलाच्या या धाडसावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मुलाला काही कमी-जास्त व्हायला नको असा विचार येऊन भीती वाटते, अशी भावना व्यक्त केली. त्या आढेगावमध्ये एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

लेशपालची आई लक्ष्मी जवळगे म्हणाल्या, “मुलाला काही कमी-जास्त व्हायला नको असा विचार येऊन भीती वाटते. लेशपाल असाच शिकावा आणि मोठा व्हावा असंही वाटतं. त्याला सहावीपासून शाळेसाठी बाहेरगावी पाठवलं होतं. स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं म्हटला आणि पुण्याला गेला. दोन दिवसांपूर्वीच त्याने दर्शना पवारच्या हत्येविषयी सांगितलं होतं. तेव्हा आम्ही त्याला घरी ये म्हटलो होतो.”

Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
vasant kanetkar novel loksatta news
वसंत कानेटकरांचा जन्मगावी अर्धपुतळा, ‘मसाप’चा पुढाकार; रहिमतपूर येथे…
pune two wheeler theft marathi news
पुणे :सिंहगड रस्ता भागात दुचाकी चोरट्यांना पकडले, पाच दुचाकींसह लॅपटॉप जप्त
pune md drugs marathi news
पुणे : गुन्हे शाखेकडून २५ लाखांचे अमली पदार्थ जप्त; मेफेड्रोन, गांजा विक्री प्रकरणात तिघे अटकेत
traffic diversion Pune city Shri Ganesh Jayanti Chhatrapati Shivaji Road
पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतूकीत उद्या बदल, छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद
pune fake gold marathi news
पुणे : चांदीच्या अंगठ्यांना सोन्याचा मुलामा, सराफाची फसवणूक करणारी टोळी गजाआड
Congress leader Ravindra Dhangekar
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर ?
pune district planning committee loksatta news
पुणे : वर्षात अडीच हजार कोटींची कामे, जिल्ह्यासाठी तेराशे कोटींसह ७५३ कोटींच्या अतिरिक्त निधीला ‘डीपीसी’मध्ये मंजुरी
pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण

हेही वाचा : “मुलीला कोयता हल्ल्यातून वाचवलं याचा अभिमान, पण धाकधुकही, कारण…”, लेशपाल जवळगेच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“तो मला म्हणाला की, घाबरू नकोस”

“मी लेशपाल आणि त्याच्या बहिणीला घरी यायला सांगितलं. त्यानंतर तो मला म्हणाला की, घाबरू नकोस. त्यानंतर मुलीने लेशपालने पुण्यात तरुणीला कोयता हल्ल्यातून वाचवल्याचं सांगण्यासाठी फोन केला. तिने काय घडलं ते सांगितलं,” अशी माहिती लक्ष्मी जवळगे यांनी दिली.

हेही वाचा : Photos : पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपालच्या वडिलांनी व्यक्त केली भीती, कोयता गँगचा उल्लेख करत म्हणाले…

“ती म्हणाली की, नऊ-साडेनऊ वाजता घटना घडली. मी मुलीकडे आणखी चौकशी केली, तर ती म्हणाली की, मला १५-२० मिनिटांनी माहिती कळेल. अर्ध्या तासात ती घटना घडली तेथे पोहचली. त्यानंतर तिने मला सांगितलं की लेशपाल घटना घडली तिथं नव्हता. तो तेथून गेला होता,” असंही लेशपालच्या आईने नमूद केलं.

Story img Loader