पुणे : प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून करणाऱ्या पाचजणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.प्रवीण दत्तात्रेय चौगुले (वय २५), यशवंत रामचंद्र खामकर (वय २४), अनिल बहिरू अजगेकर (वय २१), गोट्या ऊर्फ देवेंद्र अशोक माने (वय २०), रमेश रंगल्या देवदुर्ग (वय २०, सर्व रा. कोल्हापूर) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना एक लाख ८५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रतीक प्रमोद जगताप (वय १९, रा. धानोरी) याचा २६ सप्टेंबर २०११ रोजी शिक्रापूर कालवा रस्ता परिसरात खून झाला होता. प्रतीकचे वडील पोलीस दलात कर्मचारी होते. त्यावेळी ते राज्य गुप्त वार्ता विभागात (एसआयडी) नियुक्तीस होते.

प्रतीक याच्या खून प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली. प्रेमाच्या त्रिकोणातून प्रतीकचा खून झाला असल्याचे ॲड. कावेडिया यांनी युक्तीवादात सांगितले. न्यायालयाने सरकार पक्षाच्या युक्तीवादाची दखल घेऊन निकालपत्रात प्रेमाचा त्रिकोण असा उल्लेख केला आहे. दंडाच्या एकूण रकमेपोटी प्रतीकच्या कुटुंबीयांना दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू
Delhi High Court
Delhi High Court : वकिलाकडून न्यायमूर्तीवर अपमानास्पद टिप्पणी; दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावली चार महिन्यांची शिक्षा
Solapur rape marathi news
सोलापूर: मागास अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आठ जणांना जन्मठेप, तिघांना सक्तमजुरी

हेही वाचा >>>“मी अद्याप दारुला स्पर्शही केलेला नाही”, पिंपरीत अजित पवार यांची तुफान टोलेबाजी

खटल्यात तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरले. २६ सप्टेंबर २०११ रोजी आरोपी प्रवीणने प्रतीकला लोहगाव विमानतळ परिसरात भेटायला बोलावले होते. तेथून त्याचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. आरोपींनी धावत्या मोटारीत प्रतीकचा गळा आवळून खून केला. प्रतीकची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी शिक्रापूर परिसरातील कालव्याच्या रस्त्यावर असलेल्या झाडीत टाकून पेटवून दिला होता.

हेही वाचा >>>पुणे : कर्नाटकातून पाठविलेले पाच हजार किलो भेसळयुक्त पनीर जप्त

एका तरुणीचे प्रतीकशी प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती प्रतीकच्या आईला समजल्यानंतर तिने तरुणीला समजावून सांगितले. दरम्यान, कुटुंबीय इच्छेविरुद्ध विवाह करतील म्हणून तरुणी प्रतीकबरोबर पळून गेली. दोघांनी एका खासगी कंपनीत अर्धवेळ नोकरी करण्यास सुरुवात केली. तरुणीची आरोपी प्रवीणशी ओळख झाली. दोघेजण एकत्र राहत होते. प्रवीणने तिला विवाहाबाबत विचारले. तेव्हा तिने प्रतीकशी प्रेमसंबंध असल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे प्रवीणने मित्रांशी संगनमत करुन प्रतीकचा खून करण्याचा कट रचला.

खून करण्यासाठी आरोपी इचलकरंजीहून पुण्यात आले होते. तांत्रिक तपासात इचलकरंजी ते पुणे मार्गावरील टोलनाक्यावरील आरोपींची मोटार सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आली होती. खटल्यात तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरले. तांत्रिक पुराव्यावरुन आरोपींचा माग काढण्यात आला.