अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक ‘ताम्रपट’कार रंगनाथ पठारे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजकार्य विभागात जीवनगौरव पुरस्काराऐवजी शांताराम पंदेरे आणि प्रमोद झिंजाडे यांना विशेष पुरस्कार तर, ऑस इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क या संस्थेला डाॅ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: दोर तुटल्याने गिर्यारोहकाचा मृत्यू; मुळशी तालुक्यातील तैलबैला गडावर दुर्घटना

अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार दिले जातात. मासूम संस्था आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती मासूमच्या सहसमन्वयक डाॅ. मनीषा गुप्ते, साधना ट्रस्टचे विनोद शिरसाठ आणि पुरस्कार निवड समितीचे मुकुंद टाकसाळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.  कथा आणि कादंबरी वाङ्मय क्षेत्रातील कामगिरीबद्दल राजन गवस, अनुवाद व लेखन या क्षेत्रातील कामासाठी सोनाली नवांगुळ यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. अनिल साबळे यांच्या ‘पिवळा पिवळा पाचोळा’ या कथासंग्रहासाठी ललित ग्रंथ पुरस्कार, शरद बाविस्कर यांना ‘भुरा’ या आत्मकथनासाठी  अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार तर, ‘पुनश्च हनिमून‘ नाटकाच्या लेखनासाठी संदेश कुलकर्णी यांना रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार जाहीर झाला आहे.

हेही वाचा >>>पुणे: तापमानात वाढ, पावसाची हजेरी; आणखी दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता

दलित आणि भूमिहीनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्यासाठी औरंगाबाद येथील शांताराम पंदेरे आणि गेल्या वर्षभरात विधवा प्रथा निर्मूलनाच्या संदर्भात केलेल्या कार्यासाठी करमाळा येथील प्रमोद झिंजाडे यांना सामाजिक क्षेत्रासाठीचे विशेष कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले येणार  हे दोन्ही विशेष कार्य पुरस्कार प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील आहेत. गडचिरोली येथील कुमारीबाई जमकातन यांना संघर्ष पुरस्कार आणि नंदिनी जाधव यांना प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथील ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क संस्थेला डाॅ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lifetime achievement award to ranganath pathare by maharashtra foundation pune print news vvk 10 amy
Show comments