लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोईसाठी उद्वाहनाची (लिफ्ट) व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुलांना उद्वाहनाचा फायदा होणार आहे.

central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbai carnac Railway Flyover marathi news
कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाची तुळई रेल्वे मार्गावर स्थापन, पुलाच्या उर्वरित कामाना वेग येणार, पूल जूनपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट्य
Sir Leslie Wilson engine
मध्य रेल्वेच्या दुर्लक्षामुळे हेरिटेज इंजिन धूळखात
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द
Mumbai Western Railway Jumbo Block
जम्बो ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल; अंधेरी, बोरीवली स्थानकांवर प्रचंड गर्दी
block between CSMT Masjid on January 25 27 and February 1 3 due to Karnak Flyover work
सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा लोकल सेवा बंद, मध्य रेल्वेवर शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लाॅक
railway administration notice railway land notice to school action against school railway land Waldhuni railway land issue
कल्याणमधील वालधुनी येथील रेल्वेच्या जागेवरील शाळेला कारवाईची नोटीस; २८ जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याची सूचना

रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत भारत स्टेशन ही योजना हाती घेतली आहे. या योजनेत आकुर्डी स्थानकाचे विस्तारीकरण, सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्या अंतर्गत दोन्ही फलाटांवर उद्वाहन बसविण्यात येत आहे. एका बाजूच्या उद्वाहनाचे लोकार्पण गुरुवारी झाले. पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदूराणी दुबे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-स्मार्टसिटी प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी अखेर अटकेत

आकुर्डी रेल्वे स्थानकावरून पुणे आणि लोणावळा या दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी वृद्ध प्रवाशांना पायऱ्यांचा जिना चढण्यास अडचणी येतात. वृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान मुले यांना या उद्वाहनाचा फायदा होईल. साहित्याच्या पिशव्या उद्वाहनाने नेता येतील. आकुर्डी परिसरात नामांकित शैक्षणिक संस्था असल्याने रेल्वेने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील उद्वाहन सोईचे ठरेल. लोकार्पण केलेल्या उद्वाहनाची वजनक्षमता एक हजार आहे. दुसऱ्या बाजूच्या उद्वाहनाचा सांगाडा उभारला आहे. महिनाभरात त्याचे काम पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या दुपारच्या वेळेत सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. देखभालीची वेळ बदलून दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. -श्रीरंग बारणे, खासदार, मावळ

Story img Loader