लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी: अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोईसाठी उद्वाहनाची (लिफ्ट) व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुलांना उद्वाहनाचा फायदा होणार आहे.

रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत भारत स्टेशन ही योजना हाती घेतली आहे. या योजनेत आकुर्डी स्थानकाचे विस्तारीकरण, सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्या अंतर्गत दोन्ही फलाटांवर उद्वाहन बसविण्यात येत आहे. एका बाजूच्या उद्वाहनाचे लोकार्पण गुरुवारी झाले. पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदूराणी दुबे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-स्मार्टसिटी प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी अखेर अटकेत

आकुर्डी रेल्वे स्थानकावरून पुणे आणि लोणावळा या दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी वृद्ध प्रवाशांना पायऱ्यांचा जिना चढण्यास अडचणी येतात. वृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान मुले यांना या उद्वाहनाचा फायदा होईल. साहित्याच्या पिशव्या उद्वाहनाने नेता येतील. आकुर्डी परिसरात नामांकित शैक्षणिक संस्था असल्याने रेल्वेने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील उद्वाहन सोईचे ठरेल. लोकार्पण केलेल्या उद्वाहनाची वजनक्षमता एक हजार आहे. दुसऱ्या बाजूच्या उद्वाहनाचा सांगाडा उभारला आहे. महिनाभरात त्याचे काम पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या दुपारच्या वेळेत सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. देखभालीची वेळ बदलून दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. -श्रीरंग बारणे, खासदार, मावळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lift facility now available at akurdi station for railway passengers pune print news ggy 03 mrj