पुणे : शिवसेनेने अनेक वर्षे संघर्ष केला. त्यावेळी आम्ही सत्तेत होतो. मात्र आता आम्ही संघर्ष करण्यास शिकत आहोत, असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे सांगितले. आगामी निवडणूक ही केवळ निवडणूक नाही तर, राज्याची अस्मिता आणि अस्तित्व टिकविण्याची लढाई आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीने निसर्ग मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होेते. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा प्रमख, जिल्हा समन्वयक आणि तालुक प्रमुख या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्याला सुळे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षावरही त्यांनी टीका केली.

हेही वाचा >>>सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांचे मोठे विधान, म्हणाले न्यायालयाच्या कार्यक्रमांत पूजाअर्चाऐवजी…

दिल्लीतील सरकार राज्य चालवित आहे. पक्ष फोडले जात आहेत. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यांनी त्याची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली होती. त्यामुळे शिवसेना बाळासाहेबांचीच आहे. त्यामुळे कोणता पक्ष फुटला असे म्हणता येणार नाही. पक्षातून एक गट फुटला आहे, असे म्हणता येईल, असे सुळे यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की, भाजपही भ्रष्ट जुमला पक्ष आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. साम, दाम, दंड आणि भेद या पैकी कोणत्याही नीतीचा वापर करण्यास तयार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे. त्यामुळे वाटते तेवढी ही निवडणूक सोपी नाही. या निवडणुकीकडे केवळ निवडणूक म्हणून पाहता येणार नाही. राज्याची अस्मिता आणि प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व टिकविण्यासाठीची ही लढाई असणार आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे लागतील.