पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांसाठी गोव्याहून बेकायदा पाठवण्यात आलेला मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खेड शिवापूरजवळ पकडला. या कारवाईमध्ये ८२ लाख रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक जप्त करुन ट्रकचालकाला अटक केली.

हेही वाचा >>> डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोन साक्षीदारांची नावे न्यायालयात सादर; दोघांना हजर राहण्याबाबतचे समन्स

Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
pickup truck pakistan
पाकिस्तानमध्ये ब्रँडेड कार नव्हे तर पिकअप ट्रक चर्चेत; राजकारण्यांपासून उद्योगपतींपर्यंत वाढली मागणी, कारण काय?
MIDC police Thane, woman petrol pump director threatened, MIDC police Thane range,
उपराजधानीत गुंडगिरीचा कळस, भीतीपोटी पेट्रोलपंप चालक महिलेचे गुंडांच्या पायावर लोटांगण… व्हिडीओ व्हायरल
Cartridge seized, pistol seized, person carrying pistol arrested hadapsar,
पुणे : पिस्तूल बाळगणारा मुंबईतील सराइत गजाआड, पिस्तुलासह काडतूस जप्त
harnai port diesel seized
हर्णै बंदरात दापोली पोलिसांनी नौकेत ३० हजार लिटर अवैध डिझेल साठा पकडला
pune police pistols marathi news
पिस्तूल बाळगणारे सराइत अटकेत, सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात कारवाई
Devendra Fadnavis Nagpur, Cabinet Expansion Nagpur,
‘विजेता तू.. देवाभाऊ.. चल पुढे’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत

विपुल देवीलाल नट (वय ३२, रा. देवीलालजी नट, रोहिणीया, बासवाडा, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. गोव्यातील मद्य स्वस्त आहे. गोव्यातील मद्य अन्य राज्यात विक्रीस मनाई करण्यात आली आहे. गोव्यातील मद्याचा साठा पुण्यात पाठवण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई-बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ सापळा लावला होता. मंगळवारी पहाटे साताऱ्याहून पुण्याकडे ट्रक निघाला होता. पथकाने खेड शिवापूर टोल नाक्याजवळ ट्रक अडवला. ट्रक चालकाकडे ट्रकमधील मालाबाबत चौकशी केली. त्याने औषधांची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले. पथकाने ट्रकची तपासणी केली असता त्यातील खाेक्यात मद्याच्या बाटल्या आढळल्या. गोव्यातील मद्याची महाराष्ट्रात विक्री करता येत नाही. त्यामुळे, यासंदर्भात महाराष्ट्र दारूबंदी नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक ए. सी. फडतरे, जवान अमर कांबळे, अहमद शेख, एस. एस. पोंधे, अनिल कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader