पुणे : दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास येण्याची इच्छा परदेशातील साहित्यप्रेमींनी व्यक्त केली आहे. संमेलनास येऊ इच्छिणारे विशेषत: पाकिस्तान, इंग्लड आणि अमेरिकेतील मराठी नागरिक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरहद, पुणे आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत दिल्ली येथील छत्रपती शिवाजी साहित्यनगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे होत आहे. महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींप्रमाणे परदेशातूनही रसिक येण्यास उत्सुक आहेत. संमेलनात कसे सहभागी होता येईल, अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे. संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने पाकिस्तानातील कराची येथील महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी विशाल राजपूत तसेच लंडन येथील सुजाता गोठस्कर आणि उत्तम शिराळकर यांनी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यासाठी विचारणा केली आहे, अशी माहिती साहित्य संमेलनाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ. सतीश देसाई यांनी दिली.

हेही वाचा…व्यावसायिकाकडे ७० लाखांची खंडणी मागणारा गजाआड; कामावरून काढल्याने कामगाराकडून खंडणीची मागणी

दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी इच्छुक असलेल्या विशेषत: पाकिस्तानातील कराची येथील मराठी भाषिक साहित्यप्रेमींसंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या तसेच गृह मंत्रालयाच्या माध्यमातून योग्य ती शहानिशा करून निर्णय घ्यावा, अशी सूचना ज्येष्ठ नेते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. परदेशातून साहित्यप्रेमींनी संमेलनास येण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्याबाबतचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि संयोजन समिती एकमताने घेईल, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literary lovers from abroad expressed interest in attending the 98th all india marathi literary conference pune print news vvk 10 sud 02