राज्यातील विविध वीजनिर्मिती केंद्रांमध्ये रविवारी निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे राज्यात सुमारे तीन हजार मेगावॉटची तूट निर्माण झाली. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वीजकपात करण्यात आली.
वीजनिर्मिती केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे अदानी कंपनीची १३२० मेगावॉट, इंडिया बुल्सची ५०० मेगावॉट, जेएसडब्ल्यूमधील ६०० मेगावॉट व केंद्रीय वीजनिर्मितीमधील ५०० मेगावॉट, अशी सुमारे तीन हजार मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये वीजकपात करण्यात आली.
पुणे व िपपरी-चिंचवड शहरातील ‘अ’ गटात मोडणाऱ्या काही वाहिन्यांवर प्रत्येकी १४ मिनिटांची, तर ‘ब’ गटात मोडणाऱ्या दहा वाहिन्यांवर दुपारी दोन ते चार या वेळेत वीजकपात करण्यात आली. निर्माण झालेली विजेची तूट इतर स्रोतातून भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे महावितरण कंपनीकडून कळविण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा