पिंपरी- चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण हा परिसर उच्चभ्रू लोकवसाहतीसाठी ओळखला जातो. व्यवसाय करणाऱ्यांची संख्यादेखील त्या ठिकाणी मोठी आहे. यामुळं तिथं हजारो व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याचं वारंवार समोर आलेलं आहे. मात्र, तोडपाण्यासाठी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या अ प्रभागातील अधिकारी काही व्यवसायिकांना लक्ष करून अतिक्रमण काढत आहेत. असा आरोप स्थानिक व्यवसायिकांनी केला आहे. काढायचे असतील तर सर्वांचे अतिक्रमण काढा अशी मागणी व्यवसायिक नरेश शर्मा यांनी केली आहे.
हेही वाचा- पुणे: ख्रिस्ती समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा
सविस्तर माहिती अशी की, निगडी प्राधिकरण परिसरातील भेळ चौकात असलेल्या दुकानासमोरील अतिक्रमण काढण्यात आले. पण, त्याच्या शेजारी असणाऱ्या ग्राहक बाजार या दुकानाचे अतिक्रमण अ प्रभागच्या अधिकाऱ्यांनी काढले नाही. त्या दुकानाच्या समोर भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. तस असताना ही महानगर पालिकेचे अधिकारी व्यवसायावर पोट असलेल्या व्यवसायिकांना डोळ्यासमोर धरून कारवाई करत असल्याचा आरोप स्थानिक व्यवसायिक करत आहेत.
हेही वाचा- पुण्यात तळजाई पठारावर झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण
अ प्रभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जण अशी कारवाई करत आहेत. अस बोललं जात असून इतर दुकासमोरील अतिक्रमण अ प्रभाग काढणार का? असा प्रश्न देखील आहे. अतिक्रमण हे चुकीचच आहे, ते करू नये कारवाई करायची असल्यास सगळ्यांवर झाली पाहिजे अस स्थानिक व्यवसायिकांच म्हणणं आहे. या प्रकरणी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याशी फोन वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.