एक दशकापासून कागदावरच राहिलेल्या पोहोच रस्त्यासाठी वाघोली परिसरातील बाकोरी रस्ता परिसरातील स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मूक आंदोलने, स्वाक्षरी मोहीम, आमदार, नगरसेवक, महापालिका आयुक्त, पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे विविध पदाधिकारी यांच्या नियमित बैठका आणि वाघोलीच्या बाकोरी रस्ता भागातील रहिवाशांनी २०१३ पासून डझनभर निवेदने दिल्यानंतरही रस्ता कागदावरच राहिल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
बाकोरी रस्ता (पुणे नगर रस्त्यावरून बाकोरी गावाकडे जाणारा पोहोच रस्ता) बांधता आलेला नाही. वाघोलीतील बाकोरी रस्ता परिसरातील रहिवाशांचे प्रतिनिधित्व करणा-या वाघोली हौसिंग सोसायटीज असोसिएशनने बाकोरी रस्ता तातडीने करावा, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.