पुणे- लोहगाव विमानतळावर उतरताना सुखोई एमकेआय ३० या लढाऊ विमानाचा टायर फुटल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. मात्र तातडीने धावपट्टी मोकळी करुन हवाईवाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे हवाईदलाकडून कळवण्यात आले आहे.
नागरी विमान उड्डाणांमध्ये विलंब होऊ नये यासाठी धावपट्टी विक्रमी वेळेत सुरू करण्यात आल्याचे हवाईदलाकडून सांगण्यात आले आहे.