पुणे : पुणे लोहमार्ग पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेला, तसेच न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणातील तब्बल एक हजार किलो गांजा आणि सात किलो ८९६ ग्रॅम चरस पोलिसांनी नष्ट केला. लोहमार्ग पोलिसांनी नष्ट केलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत सव्वासहा कोटीं रुपये एवढी आहे.

लोहमार्ग पोलिसांकडून गांजा, चरससह अन्य अंमली पदार्थांची वाहतूक तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पथकांकडून १९९२ पासून आतापयर्यंत अमली पदार्थांच्या कारवाईमध्ये एकूण ४७ गुन्ह्यांमध्ये एक हजार ५०० किलो गांजा आणि चरस असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यापैकी २९ गुन्ह्यातील गांजा आणि चरस असे अमली पदार्थ लोहमार्ग न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपअधीक्षक चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या समितीने खडकी मुख्यालय येथे अमली पदार्थांचा पंचनामा केला.

pistol smuggler arrested with four others in Pimpri Chinchwad
कारागृहातून बाहेर पडताच वाहन चोरीचे गुन्हे; दोन मोटारी, पाच दुचाकी जप्त
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
95 percent increase in cost of Versova Bay Madh connecting project ravi raja Mumbai news
वर्सोवा खाडी – मढ यांना जोडणाऱ्या प्रकल्पाच्या खर्चात ९५ टक्क्यांनी वाढ; विरोधी पक्ष नेता रवी राजा यांचा आरोप
Malad accident case, Five people arrested,
मालाड दुर्घटनाप्रकरणी पाच जणांना अटक
Police beaten, encroachment, Pimpri,
पिंपरी : पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण काढताना पोलिसांनाच मारहाण
criminal attacked on police with sword and police opened fire
बुलढाणा : गुन्हेगाराचा तलवारीने वार, पोलिसांनी केला गोळीबार!
Two sent to Yerawada jail in Kalyaninagar accident case Pune news
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी
Bajaj Finance officials beaten up by borrowers in Kanchengaon in Dombivli
डोंबिवलीतील कांचनगावमध्ये बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना कर्जदारांकडून मारहाण

हेही वाचा – देशात निश्चित महागाई वाढली- उत्तरप्रदेश उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य

लोहमार्ग पोलिसांनी अमली पदार्थ रासायनिक विश्लेषण तज्ज्ञ, प्रदूषण नियंत्रण महामंडळातील अधिकारी, शासकीय वजन-मापन विभागातील अधिकाऱ्यांच्या समक्ष अमली पदार्थांचे वजन करून तो नष्ट केला. पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, संतोष गायकवाड, सहायक निरीक्षक युवराज कलगुटगे, अमोल गवळी आदी उपस्थित होते.