ही निवडणूक खासदार निवडण्यासाठी आहे. पंतप्रधान निवडण्यासाठी नाही, हे मतदारांनी लक्षात घ्यायला हवं असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले, ते रविवारी चाकण येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचा नारळ फोडण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, नेते अजित पवार, जयंत पाटील, माजी आमदार विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले, समोरून वैयक्तिक टीका होत असेल तर मी कोणावर टीका करणार नाही कारण ती माझी संस्कृती नाही. या टीकांना मी भीत नाही, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा सच्चा मावळा आहे. पण, हे लक्षात घ्या माझ्यावर वैयक्तिक टीका करून मतदार संघातील प्रश्न सुटणार आहेत का? मला प्रश्न विचारण्याचा काय अधिकार अस हे कस म्हणू शकतात. कारण देशात लोकशाही आहे. इथे जनता जनार्दन ही राजा आहे.

अढळराव पाटलांवर टीका करताना कोल्हे म्हणाले, परवा शिवनेरी त्यांनी वढू अशी रॅली काढली, तेव्हा मला वढू येथून फोन आला. या खासदारांनी पंधरा वर्षात एकही रुपयांचा विकासनिधी दिला नाही आणि आता यांना या ऐतिहासिक स्थळांची आठवण झाली आहे.

तसेच स्थानिकांची जोरदार मागणी असलेल्या बैलगाडा शर्यतीवर बोलताना कोल्हे म्हणाले, ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल, त्या पहिल्या दिवशी बैलगाड्यापुढे मी स्वतः घोडा हाकणार आहे.